मी होतो तेथे

मी होतो तेथे
मलाही धरले त्यांनी
हं याच्यावर घ्या, याच्यावर घ्या
याच्या शर्टावर रक्त छान पसरलेय
याला अधिक कव्हरेज द्या

मग तुम्हाला आता कसे वाटतेय
बॉम्ब फुटला तेव्हा तुम्ही होता कुठे
मॅडम तो बघा एक हात तुटलेला माणूस
याला सोडा कॅमेरा घ्या हो तिथे


मी होतो तेथे
पण मी वाचलो
आपल्या रक्तवाहिन्या चिरून
व्यावसायिक वाहिन्यांचे भांडवल झालो


प्रेरणाः आज तक, सबसे तेज


तुषार जोशी, नागपूर
आकाश म्हणजे सीमा नव्हे, नक्षत्रांचे दार होय