बायकोशी हातघाई चालली

बायकोशी हातघाई चालली
हारण्यासाठी लढाई चालली


मेव्हण्यासाठीच त्याची नोकरी
सासऱ्यासाठी कमाई चालली


ऐकुनी बाबा किती आनंदले
आज माहेरास आई चालली


मी मला समजूत ही घालायची—
ना! न ना! दादा, नि ताई चालली


झोंबती नजरा जश्या माश्या तिला
पदपथावर ती मिठाई चालली


छापखान्यांची कमाई चालली
चालली वायाच शाई चालली