त्या दिवशी

आज मी
दूध भात भेंडीची भाजी खातोय.
उद्याही हेच खाईल
कदाचित परवाही!
बाकीचं तर तू लाटलंयस!


पोट यानंही भरतं
पण आग विझत नाही.

ज्या दिवशी ही आग
माझ्या हृदयापर्यंत पोहचेल-
मी तुझ्या नरडीचा घोट घेईल.


                                            शिवश्री गणेश धामोडकर