ऐकावे ते नवलच- आशियातील पूल

या भागात आपण आशियातील काही निवडक पुलांची माहिती करून घेऊ.   जगातील सर्वात जास्त लांबीचा आकाशी काईको ब्रिज हा लोंबता पूल जपानमध्ये आहे.   

अकाशी काईको ब्रिज, जपान

महत्त्वाची माहितीस्थळ - कोब ऍन्ड अवाजी-शिमा, जपान
बांधकाम पूर्ण झाले- १९९८
लांबी: १२८२८ फूट
पुलाचा प्रकारः लोंबता पूल
साहित्यः स्टील
सर्वात जास्त एकसंध लांबीः ६५२७ फूट



 

akashi

  • हया पुलाची लांबी ब्रुकलीन ब्रिजच्या चौपट आहे. 
  • ह्या पुलाच्या बांधकामासाठी ज्या तारा लागल्या त्यांची लांबी म्हणजे ७.५ वेळा पृथ्वीचा परीघ मोजण्याएवढे आहे. ३००००० कि. मी. 
  • ह्या पुलाने सर्वात जास्त लांबीचा, सर्वात जास्त खर्चिक आणि सर्वात जास्त उंचीचा असे तीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.


  जपानमध्ये दरवर्षी वादळे, भूकंप आणि सुनामी येत असतात. या सर्व अडचणींवर मात करून तेथील अभियंत्यांनी अनेक पूल बांधले आहेत. अकाशी काईको ब्रिज तर जगातील सर्वात जास्त लांबीचा आणि सर्वात जास्त उंचीचे मनोरे असणारा पूल आहे. ह्या पुलाच्या बांधकामात नवे तंत्रज्ञान वापरून तेथील अभियंत्यांनी या लोंबत्या पुलाला ट्रस म्हणजेच रस्त्याला आधार देणाऱ्या त्रिकोणी साखळ्यांनी अधिक बळकट केला आहे.  यामुळे पुलाला भक्कम आधार जरी मिळाला तरी अशा प्रकारच्या रचनेतून वारा जोराने वाहू शकतो. त्यावर मात करण्यासाठी अभियंत्यांनी प्रत्येक मनोऱ्यात ट्यून्ड मास डँपर्स बसवले.  हे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हालतात.  थोडक्यात वारा ज्या दिशेने पुलाला हालवू शकतो त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच वेगाने हे झोके घेतात. त्यामुळे वाऱ्याचा  प्रतिकूल प्रभाव नाहीसा होतो. अशाप्रकारे ताशी १८० मैलाच्या वेगाचे वारे हा पूल सहन करू शकतो. 


लुपू ब्रिज, चीन


हा पूल जगातील मोठा कमानीचा पूल आहे. ह्या पुलाने हुगांगपु नदीवरील शांघायमधील लुवान आणि पुडोंग असे दोन भाग जोडले आहेत. हा पूल २००३ साली बांधून पूर्ण झाला.  ३९००मीटर लांबीचा हा पूल आता जगातील सर्वात मोठा कमानीचा ब्रिज आहे. या आधीचा विक्रम अमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया   येथील न्यू रिवर जोर्ज पुलाच्या नावावर होता. 

lupu bridge

 


तॅतरा ब्रिज, जपान


हा जगातील सर्वात जास्त लांबीचा तारांनी बांधलेला पूल आहे. हा पूल हिरोशिमा आणि शिकोकू ही शहरे जोडतो. हा पुल १९९९ मध्ये पूर्ण झाला.  ह्याची एकूण लांबी १४८० मीटर असून पुलाचा सेंट्रल स्पॅन ८९० मीटर आहे. चीनमध्ये जगातील सर्वात जास्त लांबीच्या तारांच्या पुलाचे बांधकाम सुरू असून पूर्ण झाले की हा पूल तॅतरा ब्रिजपेक्षा अधिक जास्त लांबीचा सेंट्रल स्पॅन असणारा (१०८८ मीटर) तारांचा पूल होईल. 

tatara_ph01

 


 भारतातील हावडा ब्रिज


कलकत्ता येथील हुबळी नदीवर बांधलेला रविंद्र सेतू किंवा हावडा ब्रिज हे कॅन्टिलीव्हर पुलाचे एक उदाहरण आहे. या पुलावर १९४३ च्या फेब्रुवारी महिन्यात वाहतूक सुरू झाली.  हा जगातील चौथ्या क्रमांकाचा लोंबता कॅन्टेलिवर पूल आहे. याला तीन मुख्य स्पॅन असून त्यापैकी सर्वात मोठा स्पॅन साधारणपणे १५०० फूट आहे.  ह्या पुलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे दोन पादचारी मार्ग आहेत.  हा पूल बांधण्याकरता २७ हजार टन एवढे स्टील लागले.


 


DSC00958


 


लक्ष्मण झुला
१९३९ मध्ये पूर्ण झालेला हा पूल गंगा नदीवर उत्तर प्रदेशातील ऋषिकेश येथे आहे. हा पूल लोंबता पूल या प्रकारचा आहे.


महात्मा गांधी पूल
बिहारमध्ये पाटणा शहरातील गंगा ब्रिज आता महात्मा गांधी पूल म्हणून ओळखला  जातो. हा पूल १९८२ साली पूर्ण झाला. या पुलाने हाजीपूर ते दक्षिण पाटणा असे अंतर जोडले आहे.


इतर माहिती
कोकणातील रेल्वे पूल हे लोंबत्या प्रकारचे पूल असावे असे वाटते, त्याविषयी अधिक माहिती मिळाली तर हवी आहे. 


स्टिवन ऑस्ट्रो या लेखकाचे ब्रिजेस हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचावे अशी वाचकांना विनंती. एरिक डिलोनी याचे द लँडमार्क अमेरिकन ब्रिजेस हे सुद्धा माहितीपर पुस्तक आहे. स्ट्रक्चर या संकेतस्थळावर तसेच विकीपिडियावरही काही उपयुक्त माहिती मिळू शकेल.