रोज रोज फक्त तुझे, एकच स्वप्न दिसे

आशा भोसलेः



रोज रोज फक्त तुझे, एकच स्वप्न दिसे
काजळ रात्री जसे, डोळ्यातं तेवावे
स्वप्नांचे दीप जसे


तुझ्या स्मृतींच्या जाता येता, ओठांवर फोडी
एकटेपणा आणि वेदनेला आली गोडी
रोज रोज फक्त तुझे...


छोटासा हृदयाचा गोंधळ हा सोडव रे तू
जगणे शिकले मरता मरता, मरणे शिकव रे तू
रोज रोज फक्त तुझे...


अमित कुमारः



डोळ्यांवरती तुझी अचानक बट ही आली गं
बिच्चाऱ्या काही स्वप्नांची झोप उडाली गं
रोज रोज फक्त तुझे...





मूळ गीतः रोज रोज आखों तले
चित्रपटः जीवा
गायकः आशा भोसले, अमित कुमार
संगितकारः राहूल देव बर्मन
गीतकारः गुलज़ार
मराठी स्वैर अनुवादः तुषार जोशी, नागपूर


गुलज़ार च्या गिताचा मराठी अनुवाद करणे आणि राहूल ची चाल पण जपणे हे अवघड आहे पण मी एक प्रयत्न केलाय.  वाचक मायबाप सांभाळून घेतीलच ही भाबडी आशा आहे.


तुषार जोशी, नागपूर