आपलं नातं

 


आपलं नातं कवितेचं
आपलं नातं शब्दाचं
कधी शब्दांपलीकडल्या
अथांग निःशब्दाचं

आपलं नातं पत्रांचं
आपलं नातं हट्टाचं
कधी नाजुक स्वप्नांचं तर
कधी कठोर सत्याचं


आपलं नातं स्नेहाचं
गंध वेड्या अबोलीचं
वर वर सीमित पण
सागर गहिऱ्या खोलीचं



आपलं नातं अश्रूंचं
आपलं नातं दुःखाचं
आनंदाचं मन आणिक
वेदनेच्या रूपाचं


तुषार जोशी, नागपूर