''टुकार"

संदर्भ ः चक्रपाणि ह्यांचे 'मागणे' ( http://www.manogat.com/node/6606 ) , व त्यावर रंगलेला तू-तू-मै-मै चा कार्यक्रम. जमीन ः  चित्त ह्यांची अप्रतिम गझल 'वसंत माझियाकडे पहात हळहळयाचे' ( http://www.manogat.com/node/4652 )

अनेक स्फोट जाहले तरी अम्ही झुकायचे
नि दूरदर्शनावरी मधाळसे हसायचे

नकोस तू रचू तुझे 'टुकार' काव्य त्यावरी
स्वतः:स त्रास द्यायचा, अम्हासही छळायचे

असेल चक्रपाणि तो, म्हणून काय जाहले
खुशाल चित्तरंजनापुढे उभे रहायचे!?

नवे गटार शोध तू नि लोळ त्यात, गर्दभा
उगा मनोगतावरी 'टुकार' गीत गायचे

तुझे 'टुकार' 'मागणे' मनोगता न धार्जिणे
तयास घेउनी इथे कशास कडमडायचे

प्रकाशमान सूर्य मी, प्रमाण शब्द मी खरा
तुझी स्तुती करावयास काजवेच व्यायचे

तुझा न रंग लाल अन तुझा न पंथ वाम तो
लिहू नकोस काव्य तू, तुला न ते जमायचे

उगाच 'खोडसाळ' तू करू नकोस वल्गना
कळे न का तुला कधी, कुणास झोडपायचे?