सांग रे गड्या...

(मनोगतींनो, जीवन जिज्ञासा यांच्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद म्हणून हि कविता लिहिली आहे. पौगंडावस्थेतील मुले हि या कवितेचे अपेक्षित वाचक आहेत म्हणून सोप्या भाषेत लिहिली आहे. कदाचित इतरांना बाळबोध वाटेल. मला वाटत असे या मुलांना जागरूक करणारे असे प्रयत्न वाढायला हवेत. जीवन जिज्ञासा आणि इतर मनोगतींच्या आग्रहाखातर प्रकाशित करत आहे.)


सांग रे गड्या...


सांग रे गड्या, मला का हे आजच  असे?
मी असा पण आज मला का जाण नसे?


ती पळाली का आज अशी?
कधी येईल मलाही मिशी?
कधी गाठेन रे मी ती एकवीशी?
अन कधी कोरेन मी दाढी मिशी?


सांग रे गड्या, मला का हे आजच  असे?
मी असा पण आज मला का जाण नसे?


नको असा गोंधळू मनात,
हे बदल असती तुझ्या तनात,
येईल हळूच तुझ्या ध्यानात,
अन ती हि सांगते आईच्या कानात.


सांग रे गड्या, मला का हे आजच  असे?
मी असा पण आज मला का जाण नसे?


वय हे वेडे असते थोडे विचित्र!
आई सखी अन बाबा आता मित्र!
सांगेन तुला मी हे सचित्र!
बदलतात थोडे आपले काही गात्र!


सांग रे गड्या, मला का हे आजच  असे?
मी असा पण आज मला का जाण नसे?


अरे सख्या हे छान असे...
तारुण्याची ही धार असे...
वैविध्याची ही जाण असे...
तुझ्यातला हा प्राण असे..


ऐक रे गड्या हे आज असे...
हि तारुण्याची जाग असे...
तू असा अन ते ही तसे...
आज तुझ्यातला हा प्राण दिसे..


चाणक्य