सुखी

जरी असा मी दुःखवेडा


परि नव्हे मी एकटा..


शब्द साथीदार माझे..


वेदना माझी सखी..


जरी क्रुसाशी टांगलेला


श्रांत अन रक्ताळलेला..


ओजस्व डोळे सांगताहे..


नाही कुणी इतुका सुखी..!!


- मुरारी