श्रावणाने.....!
विरहाचे दाखविण्या मोल श्रावणाने....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....
नभी मेघ करती, सावळे या मनाला;
किती पोहचावे खोल श्रावणाने....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....
तुलाही मलाही असे चिंब पहाता,
ढाळला स्वतःचा तोल श्रावणाने.....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....
जरी शुष्कतेचा मुखी रंग माझ्या,
अंतरी ठेवली ओल श्रावणाने....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....
असा स्पर्शता गार वारा तनाला,
तुझे याद केले बोल श्रावणाने....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....
अशा या सरींत पुन्हा तू दिसावी;
सारेच योजिले घोळ श्रावणाने....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....
कागदी न शब्द ऋतुच्या सरी या
सुचविली काव्याची हर ओळ श्रावणाने....
नवे निर्मिले कल्लोळ श्रावणाने....