मुगाच्या डाळीची खिचडी

  • बासमती तांदुळ १ वाटी, अर्धी वाटी मुगाची डाळ, ३ वाट्या पाणी
  • १ वाटी गाजर व सिमला मिरचीच्या जाड फोडी
  • १ वाटी मटार, १ वाटी फ्लॉवरची मोठी फुले
  • १ वाटी जाड चिरलेला कोबी, ४-५ लसुण पाकळ्या, थोडे आले,
  • २ मिरच्या, अदपाव कांदा, मीरपूड अर्धा चमचा, मीठ,
  • मोहरी, हिंग, जिरे, हळद, फोडणीकरता तेल
३० मिनिटे
२ जण

तांदुळ व डाळ पाण्यामध्ये धुवून रोवळीमधे १ तास निथळत ठेवावे. नंतर लसूण, आले, मिरच्या खूप बारीक चिरणे. कांदा बारीक व उभा चिरणे. तेलाच्या फोडणीमधे आले,लसुण,मिरची,कांदा व मिरपूड घालून २-३ मिनिटे गुलाबी रंगावर परतणे. नंतर भाज्या व डाळ तांदुळ घालून परत २-३ मिनिटे परतणे. नंतर या मिश्रणात डाळ तांदुळ प्रमाणाच्या दुप्पट पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून एकसारखे ढवळून शिजवणे. कूकरमधे खिचडी केली तर वाफ धरल्यावर लगेच गॅस बंद करणे.

मुडाखि म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी हे सर्वांना माहिती आहेच.

रोहिणी

गरम व तिखट खिचडी खाताना बरोबर थंडगार दही खाणे. खिचडीबरोबर पाहिजे असल्यास टोमॅटो काकडीचे गोल काप, भाजलेला/तळलेला उडदाचा किंवा पोह्याचा पापड, लसणाची चटणी, टोमॅटो सूप/सार किंवा कढी घेणे.

स्वानुभव