खूप जुनी झाली आहे ही पासोडी आता..
हजार ठिकाणी विरली आहे..
कधी मी.. कधी तू..
तुटेपर्यंत ताणलं होतं
त्याच्या खुणाच त्या..
तरीही रोज रात्री तीच पांघरते हट्टाने
कधीकाळी तिने थंडी कशी पळवून लावली होती
त्या आठवणींची ऊबसुद्धा पुरेशी वाटते..
तुला.. नाही का रे वाटत तसं...??