मवाली

̱कधी कधी आपल्या रोजच्या वापरातले ओळखीचे शब्द अगदी अचानक पण खूप वेगळ्या संदर्भात समोर येतात. फार पूर्वी मध्यपूर्वेतील अरब देशात राहात असताना हळूहळू अरबी भाषेशी दोस्ती झाली आणि आपले नेहमीचे मराठी शब्द चक्क तिथेही भेटू लागले !!!!


उदाहरणार्थ, मान-मरातब मधला मरातब हा शब्द मूळचा अरबी भाषेतला आणि त्याचा अर्थ आहे 'गादी'. तसेच आपण 'व' हे अक्षर मराठीत उभयान्वयी अव्यय (चु. भू. द्या घ्या) म्हणून वापरतो. अरबी भाषेतही 'व' चा उपयोग अगदी असाच आहे.


मंडळी, आपण मवाली हा शब्द बऱ्याच वेळा वापरतो. परवा अचानक ह्या शब्दाची व्युत्पत्ति पण अरबी भाषेतून आहे असा शोध लागला. मवाली चा अर्थ आहे वांशिक दृष्ट्या अरब नसलेले मुसलमान. शब्दांच्या अर्थांचा हा प्रवास पाहून गंमत वाटली. मूळ दुवा इथे देत आहे. मवाली


असेच अजून कोणाला काही माहित असेल तर जाणून घ्यायला आवडेल.