चांदणं

चांदणं


आठवणींच्या चांदण्या
लुकलुकतात नभात
लक्ष्य ज्योती उजळतात
निरभ्र आकाशात


न्हाऊन निघते काया
त्या शांत प्रकाशात
धुंदावते गात्रं न् गात्र
त्या मुग्ध वर्षावात


तोडून सारे तारे
अलगद घेते पदरात
तुझ्या स्पर्शाचे धुमारे
मग प्रत्येक श्वासात


रात्र चढते जशी
भिनते नसानसात
तुझा तीव्र आभास
ह्या टिपूर चांदण्यात