खाजगी आयुष्य!

चर्चे संबधीचे प्रतिसाद बघता मला एक विषय सुचवावासा वाटतो.


विषय असा आहे - आपल्यापैकि कोणिही, सप्ताहाच्या कुठल्याही दिवशी (कदाचीत रविवार सोडून) आपल्याला जेकाहि आपल्या घरी अथवा कचेरित किंवा भ्रमणध्वनिवर जे दूरध्वनी येतात ते येणे कितपत योग्य आहे.


येणारे दूरध्वनी खालिल प्रमाणे आहेत.


१. क्रेडिट कार्ड


२. लोन


३. अकाउंट ओपनींग - शेअर दलाल, बॅंका


४. निरनीराळ्या संस्थाचे सेमिनार


५. इन्श्युरन्स


हे येणारे दूरध्वनी यावेत, तर कधि यावेत?, येऊ नयेत, तर का?


चर्चा सुरूकरण्यापुर्वी एक सुचना अशी कि, जर कोणि कॉलसेंटर अथवा टेलिकॉलींग साठी काम करत असेल अथवा कोणाचे नातेवाईक वा कुटुंबिय या क्षेत्रात कामाला असतील तर त्यांनी शेरेबाजी न करता, आणि वैयक्तिक तंटे न करता आलेल्या प्रतिसादांचे स्पष्टीकरणासहित खंडन करावे.