सत्यनारायणाची पूजा

त्या काळात आमचे घरी प्रतीवर्षी सत्यनारायणाची पूजा होत असे.आजूबाजूच्या लोकाना, स्नेह्याना निमंत्रित केले जाई.ओटीवर पूजा मांडलेली असे. त्या काळी सवर्णाना ओटीवर जाऊन सत्यनारायणास फ़ुले वाहून पूजा करता येई. मात्र अस्पृश्याना(त्यानाही  निमंत्रण असे)बाहेर अंगणात घतलेल्या बैठकीवरच तीर्थप्रसाद दिला जाई.ते लांबूनच नमस्कार करत‌ सावरकर आल्यावर त्यांच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्यास सुरवात केल्यावर वडिलांच्या मनातून व घरातून अस्पृश्यता नष्ट झाली. त्याचं द्योतक म्हणजे त्यानंतर सत्यनारायणाची पूजा जेव्हा आयोजित केली जाई तेव्हा सवर्णांबरोबर अस्पृश्यानाही ओटीवर जाऊन सत्यनारायणास  पूजेच्या ठिकाणी फ़ुलेवाहूननमस्कार करण्यास देण्यात येऊ लागला.त्याचं ज्वलंत उदहरण म्हणजे त्यावेळचे  शिक्षणाधिकारी श्री. बोबडे(चांभार), चव्हाण गुरुजी (चांभार), लक्ष्मण आयरे (महार) हरी चांभार याना सर्वांबरोबर ओटीवर बसवण्यात


येई. आमची ही सुधारणा ज्याना मानवत नव्हती ते पूजेला येणं टाळू लागले. पण ही परिस्थिती फ़ार काळ राहिली नाही.तसेच नंतरही (१९५१) सातारचे अस्पृश्य समाजातील एक सुविद्य "एक्साईज इन्स्प्क्टर" माझ्या चांगल्या परिचयाचे झाले.त्याना पूजेला बोलावून सर्वांबरोबर चहाफ़राळ दिल्यावर सानंदश्चार्य वाटले. दुसऱ्या दिवशी मुद्दाम भेटून अशी सुधारणा अजून देशावर झालेली नाहीअसं सांगितलं. सावरकरांच्या समाज सुधारणेचं हे बोलकं उदाहरण .


 


मूळः आठवणींची बकुळफ़ुले


 


पी चंद्रा


११/८/२००६