नेमप्र - नेहमी पडणारे प्रश्न

'मनोगत'वर वावर करताना नव्या-जुन्या सदस्यांना अनेक प्रश्न पडू शकतात. यात नेहमी पडणारे प्रश्न वेगळे काढून त्यांच्या उत्तरासहित एक सूची बनवावी म्हणून हा चर्चा प्रपंच. या सुचवणीबद्दल शशांकरावांचा आभारी आहे.


मला सुचलेले काही 'नेमप्र' खालीलप्रमाणे



  • दुवा कसा द्यावा?
  • शुद्धलेखन कसे तपासावे?
  • चित्र कसे चिकटवावे?
  • व्यक्तिगत निरोप कसा लिहावा?
  • प्रशासकांना व्यक्तिगत निरोप कसा लिहावा?
  • माझ्या संगणकावर मराठी अक्षरे नीट का दिसत नाहीत?
  • महाजालाशी जोडणी न करता मराठी लिहिता येईल का?

सदर चर्चेद्वारे अशा प्रश्नांचे संकलन करूया. आणि मग आणखी एका चर्चाविषयाद्वारे असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचे रीतसर दुवे सांधता येतील. याच चर्चेमध्ये या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विविध प्रतिसादांचे दुवेही एकत्रित करता येतील.