ही माझी गझल(?) की गझलसदृश्य कविता.. पण इथे टाकतेय.. जाणकार मार्गदर्शन करतीलच..
वनवास
राम भोगतोच आहे इथं वनवास
रावण हुंगतो आहे अत्तरांचा सुवास
एव्हढ्या सोसल्यात उन्हांच्या झळा
आठवतही नाही गतायुष्याचा मधुमास
रोज नवे अश्रू पिऊन हसायचेच आहे
कधी संपणार असा हा वेदनेचा प्रवास
ओरडूनही न ऐकणारे जणू बहिरेच ते
करू नका हुंदक्यांनो बोलण्याचा प्रयास..
सुप्रिया