जीवनात ही घडी अशीच राहू दे!

(घुसळलेले लोणी - २६)


एका निवांत सायंकाळी टिपलेले हे काही क्षण...
शांत पसरलेले पाणी... ... अन् आपसूक सुचणारी गाणी... ...
चिवचिव अन् किलबल... धडपड अन् फडफड... रुणझुण अन् गुणगूण...


... ... ... ...


               


   निर्मळ जळ अमृत वेळ | अनोखा मेळ निखळ खेळ ||  


 


 


                 


   जोडगोळी या निवांत पळी | चाखतसे ही तृप्ती निराळी ||  


 


 


   


   हा गलबला | जीवलग मेळा ||     चला चला.... | साठवू या डोळा ||  


.... ... ...


 


कोवळ्या या जीवांचा अफाट हा सोहळा |
...... ...... ......
निवांत एका सायंकाळी जपता यावेत असे कण... याचसाठी - केवळ याचसाठी - तर ना ही सारी सारी वणवण... ...


तळटीप -
तसे हे प्रसंग आपल्या साऱ्यांच्याच जीवनात येणारे... तरीही आनंद लुटण्यातील समाधानासाठी हे वरील प्रकटन!
निरव शांततेची पूजा मांडताना प्रतिसादांची अपेक्षा तीळमात्रही नाही... आपल्यालाही एखादा क्षण यानिमित्त गवसावा यातच आनंद!!