हिरव्या टमाट्याची चटणी

  • अर्धा पाव हिरवे टमाटे, ४-५ हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, १ चमचा तेल,
  • मीठ चवीनुसार, अर्धा चमचा जिरे, २ मोठे चमचे भाजलेल्या तिळाचे कुट
  • चवीनुसार साखर
३० मिनिटे
४ जणांकरिता

प्रथम टमाटे चिरुन घ्या. गॅसवर कढई तापत ठेवा. त्यात १ चमचा तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात टमाट्याच्या फोडी टाकुन परता. त्यात मिरच्या, जिरे कोथिंबीर टाका. टमाटे नरम झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर बाकी जिन्नस टाकून वाटा.  चट्नी भांड्यात काढुन वरुन हिंगाची फोडणी (ऐच्छिक) दिल्यास खमंग लागते.  लसूण घालूनही खमंग लागते.

भाकरी, पराठ्याबरोबर तसेच ब्रेडला लावूनही चांगली लागते.

आई