पिकलेल्या केळ्यांचा शाकाहारी केक

  • केळी --३ पिकलेली , दूध-- १ वाटी
  • काजू,बदाम,चारोळी २ चमचे बारीक तुकडे,(ऐच्छिक)
  • २ वाट्या रवा , तूप--१/२वाटी,
  • साखर---३चमचे कॅरॅमल साठी
  • गूळ-----१+१/२(दीड)वाटी , पाणी २ वाटी.
  • बेकींग पावडर---१+१/४ (सव्वा)चहाचा चमचा.
३० मिनिटे
१० जणाना पुरेल

१  -  दूध आणि केळी मिक्सरवर वाटून घ्या. 

२  -  ऍल्यु. च्या परसट भांड्यात ३ च. साखर+१ च.पाणी घालून गॅसवर ठेवा.ढवळत रहा, गडद ब्राऊन होईपर्यंत ढवळा.यालाच कॅरॅमल म्हणतात.गॅस बंद करा.भांडे पकडीने फिरऊन तळाला सगळीकडे कॅरॅमल पसरवून घ्या.भांडे थंड होऊ द्या.

३  -  २ वाटी पाणी उकळून त्यात  दीड वाटी गूळ विरघळवून घ्या.

४  -  कढईत मध्यम आचेवर १/२वा.तुपात रवा छान भाजून घ्या.खाली उतरवून त्यात बे.पावडर,दूधकेळ्याचे मिश्रण,१/८ च.मीठ,गूळपाण्याचे मिश्रण,सुकामेव्याचे तुकडे घालून एकत्र करा.व हे मिश्रण वरील कॅरॅमल असलेल्या भांड्यात ओता व कुकरमध्ये पाणी घालून,शित्ती बाजूला काढून १५ मिनीटे वाफवा.थंड झाल्यावर जाळीवर उपडा टाका.कापून सर्वानी खा. आणि न विसरता प्रतिक्रिया कळवा.

नाहीत.

-