लाडक्या, हास रे लाडक्या !


लाडक्या, हास रे लाडक्या



लाडक्या, हास रे लाडक्या ।
कुठलेही फुल, इतके न सुंदर असे ।
जितका आहे, चेहरा तुझा ॥ धृ ॥


हे हास्य तुझे, न कोणी, कधीही हरो ।
आणि पुष्पशय्येवर विहरो, ते यौवन तुझे ।
देवास आहे ही प्रार्थना ॥ १ ॥


तुला पाहिले आणि ते दिस स्मरू लागले ।
डोळ्यांच्या विझत्याशा ज्योती, पुन्हा जागल्या ।
मी होतो तुजसारखाच ॥ २ ॥


तू लाडक्या चल जपून, जग हे वाईट आहे ।
घडते बिघडते, आपलीच छाया इथे ।
निष्प्रेम आहेत सारे इथे ॥ ३ ॥


मूळ हिंदी गीत: मुस्कुरा लाडले मुस्कुरा
गीतकारः केदार शर्मा
संगीत: पंकज मलिक
गायक: मन्ना डे
चित्रपट: जिंदगी


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०८२३