मनुष्य प्राणि

काय मजा आहे. मनुष्य विचार करतो. कधी तरी भाषेचा उगम झाला आणि विचार एक दुसय्राना कळू लागले. नविन शोध लागू लागले जग जवळ येऊ लागले. नविन शोध मग पैसे मिळवायचे साधन झाले. कोणी चांगल्या मार्गाने कोणी वाईट मार्गाने. मग सत्ता गाजवण्यात स्पर्धा आली. वेगवेगळे देश तयार झाले. एकमेकांच्या देशात जायला परवानग्या लागायाला लागल्या. लोकसंख्या वाढली. जगायचे नियम तयार झाले. अर्थात निसर्गनियमाना डावलून. कोणा एका माणसाच्या महत्वाकांक्षेसाठी (पैशाच्या/सत्तेच्या) बाकी सर्व राबू लागले.


 तेव्हा मनात विचार येतो की चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर येणारा मनुष्यजन्म खरच का श्रेष्ठ आहे? की बाकी सर्व पशुपक्षी जे निसर्गनियमांप्रमाणे रहातात, त्याना यातला फोलपणा कळला आहे ( सर्व माया आहे ) म्हणून तेच श्रेष्ठ आहेत?


हे आश्चर्यच नाही का की एक मनुश्य सोडला तर बाकी कोणीच प्रगति करू शकला नाही! अगदी रोज माणसाचे निरिक्षण करणारे कुत्रे,मांजरी वगैरे प्राणि


कितीही वाजली तरी चादरी चोरत नाहित की पाऊस पडला तरी प्लास्टीक पळवत नाहित. पण भूक लागली तर अन्न मात्र पळवतात.


झाडांची तऱ्हा तर अजून वेग़ळी. तूम्हाला काय वाटते?