आल्या निवडणुका
आल्या आल्या निवडणुका,
गावोगावी भरतील सभा,
उमेदवार येती पुढे,
घाला त्यांना हारतुरे,
विरोधीपक्षा दयावया दणका
रटाळवाण्या भाषणांची,
तोंडदेखल्या आश्वासनांची
जनतेला देती शिक्षा
त्यांच्याकृपे इमारती पडतील,
जनतेला मग पैसे पांघरुणे देतील,
सारे चाले मिळवण्या मते,
काही पडू नये उणे
घालून खादी टोपी हात जोडावे
असती नुसते हे देखावे
मतेही त्यांचीच मोजणारे त्यांचे
सारे जनतेला देण्या गुंगारे
सत्ता मिळता खूष होतील
विरोधी पुन्हा कामा लागतील
पुन्हा निवडणुका येतील...
गावोगावी सभा भरतील....