मुडदेफरास

दारात कल्पनांच्या उन्मत्त हा उभा मी
शब्दांत मात्र गोची होणार खास आहे

देण्या विडंबकाला फटकार आसुडाचे
ही आयडी कुणाची ह्याचा तपास आहे

दिसताच फाडतो हा साऱ्या नविन गझला
हा खोडसाळ कसला, मुडदेफरास आहे

कवनात रंग माझ्या शोधून सापडेना
हा धूळ फेकण्याचा माझा प्रयास आहे

होईल लेखणीतून केव्हा तरी कमाई
इतकाच वर मला दे, इतकीच आस आहे

फुकट्या पियक्कडांना त्या घालण्यास आळा
मी बाटलीत देशी भरली Chivas आहे

गझलेत रक्त माझे होवून शब्द आले
प्रत्येक वाचणारा हा एक डास आहे

वासावरी पुन्हा तू दिसतोस खोडसाळा
कोणी नवा कवी का फसला गळास आहे ?

आमची प्रेरणा -
इथे वाचा