ह्रदयद्रावक कविता

मित्रांनो, आज सकाळीच खालिल कविता व्य नि द्वारे प्राप्त झाली. कविता अत्यंत ह्रदयद्रावक असुन ती मनोगतींबरोबर शेअर केल्याशिवाय रहावत नाहिये म्हणुन हा प्रपंच ..


 


परवा दादर स्टेशनवर


एक मित्र दिसला


मला तो खुप खचलेला वाटला


विचारपुस केल्यावर


लखलखत्या दिव्यांसमोरही


अचानक अंधार पसरला


तो म्हणाल, परवा


महालक्ष्मीला चाललो होतो


बायकोला पोराबरोबर लेडिज मधे चढवुन


स्वतः जेन्टस मधे चढलो


अचानक मोठा स्फ़ोट झाला


हसता खेळता माझा मुलगा


काळ्या धुराआड लपला,


मी आणी बायको ने त्याचा शोध घेतला


लाल चिखलातुन त्याला अक्षरशः खेचुन काढला


जरा थकलेला दिसला म्हणुन


बायकोच्या  कुशित विसावला


सुजलेले डोळे किलकिले करुन


मला व बाककोला म्हणाला


देवबापाने माझी आठवण काढली आहे


बाबा मी पुढे जातो


पण


तुमची आठवण खुप येणार


रात्री झोपतांना मला गोष्ट कोण सांगणार ?


शांतपणे डोळे मिटलेल्या माझ्या मुलाकडे बघुन


स्टेशनचा खांबन खांब द्रवला


भुकंपाने धरणी काय हादरेल -


असा स्टेशनचा वासान वासा कापला


पोराने पदर घट्ट धरला म्हणुन


तीही सोबत गेली....


दोष नसतांना दु:खाचा डोंगर


हाताने उकरतो आहे.


त्याच्या स्म्रुतिसागरातिल एकेक शिंपला


भरल्या डोळ्यांनी जपतो आहे...


अचानक मित्र समोरच्या गर्दित नाहिसा झाला,


तोबा गर्दितही तो पुर्ण एकाकी वाटला.


 


 


ता.क. मित्रानो कोणास माहित आहे या कवितेचा कवी ??