अर्धा हा चंद्रमा, अन् रात्र अधुरी

अर्धा हा चंद्रमा, अन् रात्र अधुरी


अर्धा हा चंद्रमा, अन् रात्र अधुरी ।
राहो न तुझी माझी, मुलाखत ही अधुरी ॥ धृ ॥


प्रिया अधुरी आहे प्रेमाची भाषा ।
राहो अधुरीच मनात अभिलाषा ॥
अर्धे मिटले नयन, उदित अर्धे नयन ।
चक्षू अर्धोन्मिलित, अश्रुधार अधुरी ॥ १ ॥


अधुरी राहील कुठवर ही आस ।
तृप्त होणे नाही का ही आस ॥
तहानलेले गगन, तहानले उपवन ।
तहानेल्या ताऱ्यांची वरात अधुरी ॥ २ ॥


सुर कृष्णाने साधला अधुरा ।
रास राधेचा राहिला अधुरा ॥
नेत्र अर्धोन्मिलित, ओठ अर्धे उदित ।
मनीच राहे प्रेमाचे ते गूज अधुरे ॥ ३ ॥


आधा है चंद्रमा ह्या हिंदी गीताचा मराठी अनुवाद.


मूळ हिंदी गीत: भरत व्यास
संगीत: रामचंद्र चितळकर
गायक: महेंद्र कपूर, आशा
चित्रपट: नवरंग
भूमिका: संध्या


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे