अगदी मागच्या आठवड्यातील ही गोष्ट आहे. मी माझ्या काही मित्रांसमवेत पुणे महानगर पालिकेच्या बस थांब्यावरून पाषाणला जाणारी P.M.T. पकडली.. आम्हाला E-Square ला जायचे होते.
दुपारची वेळ असल्यामुळे बसमध्ये अगदी तुरळक गर्दी होती. बस मॉर्डनच्या चौकात आल्यावर पुढील दरवाज्यातून एक गलेलट्ठ असा माणूस बसमध्ये चढला.
बहुदा पुण्यात नवीनंच होता तो. कंडक्टरकडून तिकिट घेताना त्याने "म्हसोबा गेट येथे बस थांबवा" असे सांगितले..
काही वेळाने बस कृषी महाविद्यालयाच्या जराशी पुढे जाताच, कंडक्टर महाशय जोरात ओरडले..."म्हसोबा...गेट आले रे...!!!"
"म्हसोबा आणी गेट या दोन शब्दातील अंतरामुळे सहप्रवाशांमध्ये एकच हशा पिकला.. आणी मग काय.. त्या गलेलट्ठ प्रवाशाची आणी कंडक्टर महाशयांची चांगलीच जुंपली.. प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून बस मार्गी लावली..
परंतु हा किस्सा माझ्या कायमचा लक्षात राहिला..
(टीप: - हा लेख दि. १४ सप्टेंबर २००६ रोजी सकाळमध्ये प्रसिद्ध झाला आहे.. त्या बस मधला मी ही सहप्रवासी होतो... म्हणून हा लेख सर्वांसाठी येथे प्रसिद्ध करत आहे. चु. भु. क्षमस्व..)
आपला सुमित..!!