उगा स्फुंदण्याने तिच्या विरघळावे

उगा स्फुंदण्याने तिच्या विरघळावे
अता फार झाले, किती मी झुकावे ?

फुलासारखे नववधूने फुलावे
फुग्यासारखे हे असे का फुगावे ?

कशी छान होतीस गब्दुल जरासी
सुगीचे तुझे ते दिवस आठवावे

पिऊ देत नाही कशी आज पाहू
जरा ओत सोडा, जरा काजु खावे

मला पाहिजे रे पुन्हा तीच पत्नी
मुक्यांना किती वेळ, सांगा मुकावे ?

नको थंड होऊस शिशिरापरी तू
सख्या मी किती एकटे कुडकुडावे ?

असे, खोडसाळा, नका ना छळू मज
पहा सोडते बायकी सर्व कावे




आमचे प्रेरणास्थान - चक्रपाणि ह्यांची तरल गझल उगा स्पंदनाने जरासे चुकाव