आळशी वि. उद्योगी

एक आळशी माणूस झाडाखाली आरामात बसलेला असतो. एक उद्योगी माणूस येऊन त्याच्या बाजुला बसतो. बसल्याबसल्या तो आळश्याला उपदेश करू लागतो. .. त्याचे शेवटचे वाक्य असते .. खुप काम करावे खुप पैसे मिळवावे मग आराम करावा .. त्यावर आळशी माणूस म्हणतो "मग मी आत्ता काय करतोय?" ..


ही गोष्ट/विनोद सर्वानाच माहीत आहे. फक्त एकच प्रश्न पडतो की ही उद्योगी माणसे अशा आराम करणऱ्यांच्या एवढी मागे का लागतात? एवढी अल्पसंतुष्ट माणसे पाहून त्यांच्या पोटात दुखते की माणसे अशी आराम करू लागली तर त्यांच्या उद्योगधंद्याचे काय होणार अशी त्याना भीति वाटते???