तुझ्या डोळ्यांवरती मी भाळलो ग !

तुझ्या डोळ्यांवरती मी भाळलो ग !


तुझ्या डोळ्यांवरती मी भाळलो ग ।
अवखळ लकबींवरती मी भाळलो ग ॥
काय करू, काय करू, काय करू ॥ धृ ॥


रमवत केसांत सारी रात्र चलू ।
साऱ्या जगाला घेऊन साथ चलू ॥
अशा जगण्यातच मजा आहे सये ।
नेत्रपल्लवीत हितगूज करू ॥
वंचिके, बघ तरी, एकदा, एकवार ॥ १ ॥


तुझ्या तोऱ्यास उपमा न मुळी ।
प्रेमाचा माझ्याही न थांग मुळी ॥
सुंदर खूप तुझा चेहरा असो ।
अंतर माझेही न कुरूप मुळी ॥
वंचिके, बघ तरी, एकदा, एकवार ॥ २ ॥


तेरी निगाहों पे मर मर गये हम ह्या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद.


मूळ हिंदी गीत: जावेद अन्वर
संगीत: उषा खन्ना
गायक मुकेश
चित्रपट: शबनम
साल: १९६४
भूमिका: महमुद, विजयालक्ष्मी, हेलन, जीवन, मुखरी, मोहन चोटी, श्याम


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०९२१