भांडणे

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, कुत्र्याची शेपूट काही सरळ होत नाही, आणि विडंबनाचे व्यसन काही स्वस्थ बसू देत नाही !

पती दिसताक्षणी जारेस सुचले भांडणे
घरी जाऊ, असे रस्त्यात कसले भांडणे

जरा तान्ह्यास झोपू द्या, चला जा, व्हा पुढे
नको चाळीत,न्या कोर्टात खटले-भांडणे

नकोसा स्पर्श खुंटांचा खराट्यासारखा
करा रात्रीस दाढी वा न चुकले भांडणे !

घरी शेजारच्या ती गोड दिसली पौर्णिमा
अमावास्येबरोबर आज ठरले भांडणे

कशाला, खोडसाळा, वाद पत्नीशी फुका
तिला जमते तसे कोणास जमले भांडणे ?

प्रेरणा - चित्त ह्यांची सुंदर गझल तुला स्मरताक्षणी इतके बरसले चांदणे