जे जे तुला रूचेल, तेच काम मी करेन !

जे जे तुला रुचेल, तेच काम मी करेन !


जे जे तुला रुचेल, तेच काम मी करेन |
तू दिवसा रात्र म्हणशील, तर रात्र मी म्हणेन || धृ ||


पसंत करेन, पत्करेन, तुलाची मी प्रशंसेन |
प्राण नयनी असेस्तोवर, तुलाची मी न्याहाळेन |
हृद् भावना तुझ्या मी, माझ्या मुखे वदेन || १ ||


तू साथ ना देतीस तर, मी संपतो कधीचा |
तुजमुळेची तृप्त कामना, झालेल्या जीवनी ह्या |
ह्या जीवनास माझ्या, तुझी 'भेट' मी म्हणेन || २ ||


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१००१


जो तुमको हो पसंद ह्या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद.


मूळ हिंदी गीत: इंदिवर,  संगीत: कल्याणजी-आनंदजी, गायक: मुकेश
चित्रपट: सफर, १९७०, भूमिका: राजेश खन्ना, शर्मिला टागोर