महाजालाची भाषा - भाग २

महाजालाची भाषा - भाग १ 


संकेतस्थळाची बांधणी :-


सर्व जोडणी झाल्यावर मग चालू होते संकेतस्थळाची रूपरेखा व दिसणार भाग ह्याची बांधणी. ह्यासाठी तुम्हाला कमीत कमी HTML ह्या भाषेची माहिती हवी व ते कसे वापरायचे ह्याची माहिती.


संकेतस्थळ बांधणी साठी तुम्ही प्रथम आराखडा तयार करा, प्रथम तो आराखडा कागद अथवा तस्म जागेवर (मी माझ्या खोलीच्या भिंती वापरल्या.. :) आपल्या संकेतस्थळाचे रेखाचित्र काढा जेणे करून तुम्हाला काय हवे आहे व ते कसे बनवावे ह्य बद्दल तुमच्या मनामध्ये गोंधळ उडणार नाही. जेव्हा आराखडा तयार होईल तेंव्हा काम सुरु करा...


समजा मी ठरवले आहे की स्थळावर ५ महत्वाची पाने आहेत.
१ मुख्य पण
२. माझी माहिती पण 
३. मला आवडलेली चित्रे
४. माझे कार्य 
५. संपर्क


तर आपण प्रथम मुख्य पण तयार करू.
ह्यासाठी तुम्हाला <HTML>  ची माहिती करून घ्यावी लागेल.
H - Hyper T -text M - Markup L - Language हे कसे वापरावे हे पाहू


प्रथम Notpad उघडा.
खालील प्रमाणे लिहा::


<html> <---- प्रणाली-भाषा
<head> <--- अंतर्गत प्रणालीची सुरवात (खरे तर येथूनच तुमचे संकेतस्थळ आकार घेण्यास सुरवात करते सद्या तुम्हाला एवढीच माहिती जरूरी आहे ह्यचा उपयोग काय हे आपण नंतर पाहू)
<title> माझे संकेतस्थळ </title> <---Explorer चा मथळा
</head><--- अंतर्गत प्रणाली बंद
<body> <---  ह्याच्या अंतर्गत तुम्ही जे काही लिहाल ती संकेतस्थळाची प्रदर्शनी बाजू जी सर्वांना दिसेल.
welcome to my site 
<--- उदाहरण 
</body>
<---प्रदर्शनी बाजू बंद 
</html> <---- प्रणाली-भाषा बंद



नोंद: जे वर निळ्या रंगाने दाखवले आहे ते फक्त तुमच्या माहिती साठीच उपयोग करा तो भाग आपल्या Notepad मध्ये लिहू नका. 


जेव्हा तुम्ही वर दिलेली माहिती पूर्णं कराल व Notepad वर लिहाल तेंव्हा ती फाइल सुरक्षीत करा व सुरक्षीत करताना त्याचे नाव index.html असे करा. तुम्ही ज्या जागी ती फाइल सुरक्षीत करीत आहात ती जागा शक्यतो Desktop असावी कारण त्यामुळे तुम्हाला फाइल शोधताना त्रास होणार नाही.
नंतर त्या index.html फाइल ला तुम्ही उघडा तुम्हाला असे दिसेल येथे पाहा
तुमची पहिली पायरी पूर्णं.


तर तुम्हाला HTML चा वापर आपल्या संकेतस्थळावर कसा करावा ह्याची माहिती खाली देत आहे..
html मध्ये  Body  हा भाग महत्त्वाचा आहे कारण हाच भाग तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीला दिसत असतो.
येथे मी काही महत्त्वाच्या आदेशांचे जे html मध्ये नेहमी वापरले जातात त्याची यादी देत आहे... व त्यांचा वापर कसा करावा हे ही.


क्रमशः: