आंबा आणि फणस : एक बडबड गीत

लहान मुलांसाठी एक बडबडगीत देत आहे. आपणही वाचायला हरकत नाही.


आंबा म्हणाला फणसाला
काटे तुझ्या अंगाला
आत मात्र गोड गरे
किमया ही देवाची बरे



आंब्या तुझा मधुरपणा दे
विसरुन जाऊ कैऱ्यांना
राहू आता मित्रांसारखे
संधी नको मग वैऱ्यांना


दोघे मला प्रिय सारखे
भूक सांगते माणसाची
एक पोळी आंब्याची
एक पोळी फणसाची


                                             .......अभिजित पापळकर