मनोगती आयुष्य

आयुष्य  तेच  आहे


आयुष्य  तेच  आहे
अन् हाच पेच आहे

बोलू घरी कुणाशी
तेही   सुनेच  आहे

तू भेटशी नव्याने..
बाकी  जुनेच आहे

केलीस याद तूही..
का हे  खरेच  आहे
                    - संगीता जोशी

अत्त्यानंदांची क्षमा मागून....



हे व्यासपीठ कसले,
घर हे माझेच आहे


खाजव पाठ माझी
मी खाजवतोच आहे


मी मांडला बघ कंपू
पळ, खेचाखेच आहे


प्रतिसाद मोजा माझे
मी मोजतोच आहे


बोलला कोण हे उल्टे
बुडवा, तो तरंगतोच आहे


श्शू, गप्प, धाड तू व्य नि
मी धाडतोच आहे


ह घ्या नका रुसू रे
मीही घेतोच आहे