ढोकळा सँडवीच

  • गिट्स खट्टा ढोकळा मिक्स
  • पुदीन्याच्या चटणीसाठी पुदिन्याची पाने,कोथींबीर,अद्रक,हिरवी मिरची,मीठ,जीरे
  • टोमॅटो केचप
३० मिनिटे
३-४

ढोकळा मिक्सच्या पॅकेटरील सुचने नुसार मिश्रण तयार करावे, कुकरच्या डब्यात तेलाचा थोडा जास्त हात लावुन मिश्रणाचा पातळ थर देवुन ढोकळा बनवावा. तयार झालेला ढोकळा हा ब्रेड स्लाईसच्या जाडीचा असावा. कुकरचा डबा कटींगबोर्डवर  किंवा एका थाळीवर पालथा करुन पुर्ण गोलाकार ढोकळा बाहेर काढावा,डब्यात बुडाला थोडे जास्त तेल लावल्याने ढोकळा अलगद बाहेर येतो. असे अजुन ३  ढोकळ्याचे स्लाईस करुन घेणे.

पुदीन्याच्या चटणीसाठीचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकुन चटणी तयार करणे.

ढोकळ्याच्या एका स्लाईसवर पुदीन्याची तीखट चटणी पसरुन त्यावर दुसरी स्लाईस ठेवुन हवे तशा आकाराचे सँडचीच कापावेत.

 अशाच पद्धतीने बाकिच्या २  ढोकळ्याच्या स्लाईसवर केचप लावुन सँडवीच बनवावेत.  अशी  पुदीन्याच्या चटणीचे तीखट  सँडवीच, केचपची कमी तीखटाची सँडवीचेस तयार.

 

 

गिट्स खट्टा ढोकळा मिक्सचा पांढरया रंगाचा ढोकळा बनतो, त्यामुळे याची वेगळ्या प्रकारची सँडवीच दिसायला आणि चवीलापण सुंदर लागतात.

प्रवासात किंवा सहलीसाठी(पिकनीक) हा पदार्थ चांगला आहे.

ढोकळा मिक्सच्या ऐवजी दाळ-तांदुळाचा ढोकळा करुन पण ही सँडवीच करता येतात.

स्वानुभव