दिवसा स्वप्ने बघतो मी...


दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...


उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...


मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...


असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...


वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...


(टीप: यातले काही शेर माझ्याच 'कधी कधी मी' या कवितेतल्या कल्पनांवर आधारित आणि जमीन माझ्याच 'जेव्हा दु:ख लपवतो मी' या गजलेची आहे.)