मका भात

  • १वाटी बासमती तांदूळ,१ मध्यम कांदा ,२ टेबल स्पून पिवळे मके,
  • मीठ चवीनुसार,१ हिरवी मिरची,१ टेबल स्पून तेल/साजूक तूप
  • +१ चहाचा चमचा साजूक तूप, १ टे‌. स्पून काजू तुकडे
१५ मिनिटे
२/३ जणांना

भात मोकळा शिजवून घ्या.कांदा उभा चिरून घ्या. मिरची बारीक चिरा.ताजे मक्याच्या दाण्यातील मके असतील तर वाफवून घ्या,कॅन मधील मके वाफवून घ्यायची गरज नाही.

एका कढईत/नॉन स्टीक पॅन मध्ये तेल /तूप तापत ठेवा.त्यात जिरे घाला,मिरच्यांचे तुकडे घाला,कांदा घाला.कांदा गुलाबीसर परता,नंतर काजू तुकडे घालून परता, मके घाला,थोडे परता.भात घाला,मीठ घाला,हलक्या हाताने शीत न मोडेल अशा बेताने परता,साजूक तूप सोडा‍‍. झाकण ठेवून वाफ येऊ द्या.

कोणत्याही spicy gravy  बरोबर खा.

तेला ऐवजी तूप घेतले तर जास्त छान लागतो हा भात.

माझे पाक-प्रयोग