रात्र

एक रात्र कोळोखी, उजेडाला पारखी
प्रकाशाच्या दिवसाची,
तीला यायची आठवण सारखी ..

दिवसाला भेटायला, रात्रभर धावली
कशीबशी एकदाची ,
मिटण्याआधी डोळे , ती दिवसाला भेटली ...

आता मात्र बिचारी , फारच थकली
पटकन झोपली ,
दिवसानीच प्रकाशाची , तीला चादर घातली ...