दिवसा स्वप्ने बघतो मी - २

दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री घोरत पडतो मी

मनोगती रचती कविता
त्यांच्यावरती जगतो मी

मनात इमले रचतो मी
खिसे रिते चाचपतो मी

विडंबने टाकुन पळतो
मलाच लपवत बसतो मी

टिवल्या-बावल्या करतो मी
खोड्या-काड्या करतो मी

नवीन कविता बघतो मी
फुले झेंडुची स्मरतो मी

दुसऱ्यांना प्रतिसाद किती
वाचुन ते जळफळतो मी

आमची प्रेरणा इथे वाचावी.