मला आवडणाऱ्या एका हिंदी चित्रपट-गीताचा भावानुवाद देत आहे.
मुळ गाणे : 'हुई ये हमसे नादानी'
चित्रपट : चोर-बाज़ार
गायिका : लता मंगेशकर
संगीतकार : सरदार मलिक
असे मैफल तुझी जेथे चुकोनी येवुनी बसले
असोनी धूळ पृथ्वीची मनाने अंबरा वरले
घडे पूर्ती न इच्छांची परी तुज दोष का देऊ
असे अविचार हा माझा, ह्रदी शर झेलुनी बसले
मला कळले कुठे बागेत प्रीतीच्या असे धोका
जिथे सौदामिनी पडते अशा फांदीवरी चढले
बघोनी फलित प्रेमाचे न यावी आसवें कैसी
जगाला लूटणाऱ्यांनी स्वत:चे घर पहा लुटले
मूळ गाणे इथे आहे. इच्छुकांनी जरूर ऐकावे.