ही बातमी तुम्ही कशी वाचली

आपण जगात नसल्याचा आभास निर्माण करून लोकांच्या भावनांशी खेळणारी साध्वी सिद्धीश्रीजी ऊर्फ समता (२२), तिचा प्रियकर कम अंगरक्षक रजनीकांत तलवार ऊर्फ रज्जूभाई आणि त्याची आई यांना मंगळवारी अमरावती पोलिसांनी सांगलीत नाट्यमय अटक केली. साध्वी सिद्धीश्रीजी यांचे अमरावतीच्या जनार्दन पेठमधील ओसवाल भवन येथे रविवारी पहाटे झोपेत भस्म झाल्याच्या कथित चमत्कारामुळे भस्माच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी रांगा लागल्या. मात्र, या प्रकारामागे काहीतरी काळेबेरे असावे, असा संशय आल्याने अमरावती पोलिसांनी रजनीकांतला अमरावतीमध्ये ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत व साध्वी यांचे एकमेकांवर प्रेम होते. साध्वी पाच जुलैला अमरावतीत आल्या होत्या. ज्या रात्री त्यांचे भस्म झाले असे वृत्त पसरले त्याच रात्री साध्वीला अतिशय नियोजनपूर्वक सांगलीत आणण्यात आले. सांगलीला वारणावती रोडवर रजनीकांतची आई राहते. याच घरात 'भस्म झालेली' ही साध्वी राहात होती. अखेरीस अमरावती पोलिसांच्या पथकाने रजनीकांतला मंगळवारी संध्याकाळी सांगलीत आणले. मग साध्वी व त्याच्या आईला ताब्यात घेतले.


-सैजन्य म.टा.