कोंबडीची पुंगी

आमचे प्रेरणास्थळ इथे वाचा.

कधी खायचा मनी विचार
कधी प्यायचा सुचे विकार

तुला पाहता उभी समोर
पळावयाचा सुचे विचार

जुना डाव हा, नवीन नाव
म्हणा द्यूत वा म्हणा जुगार

हवी कोंबडी तिखटजहाळ
किती खायचे तरी गवार

उभ्या ठाकल्या निवडणुका
जुनेच वादे, नवा प्रचार