विसावा-२

आमची प्रेरणा विसावा  ही  मिलिंद फणसे यांची रचना.


घे तुझ्या बाहूत, शीतल, माळ तुज घालून आलो
लग्नही झाले अता गे, मी पती होऊन आलो

स्फुंदणाऱ्या मैत्रिणीला सत्य हे सांगू कसे की
पुरुषजातीच्या रितीला आज मी जागून आलो

सासरा माझा म्हणाला शेवटी ती ब्याद टळली
घोडनवरी एकदाची शेवटी उजवून आलॊ

ब्रह्मचारी मित्र माझे चालले पिक्चर बघाया
दोस्तहो, थांबा जरासे, लग्न मी उरकून आलो

खोडसाळा उपरती का व्हायची नाही कधीही?
आजही कविताफुग्यांना टाचणी लावून आलो