प्रेम - आमचेही

आमची प्रेरणा - वैभव जोशींची नितांतसुंदर गज़ल प्रेम


ते म्हणाले,"प्रेम अमुचा विषय नाही"
प्रेम आम्हां वर्ज्य आहे, विषय नाही!"

एकदा भिडवीन डोळे मी तुझ्याशी
रोज भिडवायास येथे समय नाही
 
ध्वस्तले कित्येक मजनूंचे मनोरे
काय लैलांनो तुम्हाला हृदय नाही?

एकदा तूही घडव ना स्फोट ह्रदयी
अंतरी तुजवीण होणे विलय नाही

चंदनी हा गंध आला सांग कैसा
भोवती दिसती तबेले, मलय नाही

माणसांना निकड असते कापडांची
तू कशी निर्लज्ज, तुजला सवय नाही

हाय, गाद्यांचा कसा द्यावा भरवसा
ही उशांशी छेड आहे, प्रणय नाही

सोडली मैफ़िल अता मी शायरांची
खोडसाळाभोवती ते वलय नाही