तिसरा मार्ग

सध्या मनोगतावर साम्यवादावरून चर्चा चालू असतानाच, आज वाचनात आलेल्या बातमीचा उल्लेख करावासा वाटतो:


राष्ट्रपती अब्दूल कलाम यांनी दिल्लीमधे न्या. सुनंदा भंडारे स्मृती वाख्यानमालेत  "आदर्श तत्त्वाने जगणारे नेतृत्वबद्दल" बोलणे पसंत केले. यात त्यांचे म्हणणे असे होते की, "आर्थिक कारणांमुळे नव्हे तर कोत्या मनोवृत्तीच्या निर्णयशक्तीचे नेतृत्व जेंव्हा वाढते, तेंव्हा राष्ट्राचा ऱ्हास होतो". पुढे न्यायसंस्थेला अधुनिक जगात तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींमुळे नित्यनविन वादांना, तंट्यांना सामोरे जावे लागत आहे ह्याचा उल्लेख करून ते मानवी आणि नागरी हक्कबद्दल बोलले.


या संदर्भात उदाहरण देत असताना त्यांनी रा‌.स्व. संघाच्या नव्वदी उलटलेल्या नानाजी देशमुखांच्या मध्यप्रदेशातील चित्रकूट परीसरातील कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नानजींचे काम हे एक आदर्शाचा नमुना आहे जिथे, ८० खेड्यांमधील रहीवाशांनी सामुदायीकरीत्या ठरवले की आम्ही आमचे तंटे बख़ेडे न्यायालयाची पायरी न चढता सोडवू.  आणि आज हा प्रदेश तंटे विरहीत आहे....बातमीचा दूवा


विषम भांडवलशाही आणि अतिरेकी साम्यवाद यांच्या टोकाला न जाता, आपल्या संस्कारांना आणि संस्कृतीला पचेल असा मार्ग म्हणजे "तिसरा मार्ग" ("थर्ड वे" ) . यात अर्थ (वैभव - फक्त पैसा नव्हे) आणि काम ( वैभवाचा उपभोग ) हे दोन्ही धर्माच्या (संस्कार, संस्कृती अर्थाने, रिलीजन या अर्थाने  नव्हे) आणि मोक्षाच्या (जीवनातील कृतकृत्यता ) मर्यादेत (म्हणूनच अर्थात "हाव न ठेवता") जेंव्हा एक किंवा दोन माणसेच नव्हे तर संपूर्ण समाजच पाळतो तेंव्हा कुठल्याही (लोकशाही व्यतिरिक्त) "---शाहीची" अथवा "---वादाची" गरजच उरत नाही असा याचा थोडक्यात अर्थ...