कोल्हापुरी मिसळ

  • ३ वाट्या मोड आलेली मटकी
  • ४ कान्दे
  • २ वाट्या ओले खोबरे
  • १ वाटी सुके खोबरे
  • २ लसणाचे गड्डे
  • १ मोठी जुडी कोथिंबीर
  • २ मोठे चमचे कोल्हापुरी कान्दा लसूण चटणी
  • १ मोठा चमचा गरम मसाला पावडर
  • २ बटाटे चिरून
  • मीठ, तेल, हिन्ग, हळद, तिखट, पाणी
१५ मिनिटे
एकाला दोनवेळा

पातेल्यात तेलावर हिन्ग, हळद घालून त्यावर मटकी व बटाटे घालून परतावे. पाणी, मीठ, तिखट घालून शिजवावे. फ़ार मऊ नको. यात पाणी राहिले तरी चालेल.

कटाची तयारी -कान्दे उभे पातळ चिरून घ्यावे, यातला वाटीभर कान्दा बाजूला ठेवावा. उरलेला कान्दा, खोबरं (ओल, सुकं), गरम मसाला तेलावर परतून बारीक वाटावा. आले, लसूण कोथिम्बीरही बारीक वाटावी.

जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेलावर हिन्ग, हळद, उभा चिरलेला कान्दा,कोल्हापुरी चटणी घालून परतावे. दोन्ही वाटणे घालूनही चांगले परतावे मग ४ वाट्या पाणी, मीठ घालून उकळी आणावी.

वाढताना खोलगट प्लेट मधे फरसाण, मटकीची उसळ, कच्चा कान्दा, कोथिम्बीर घालावी, मग त्यावर कट घालून लिंबू पिळावा. ब्रेड बरोबर खावे. जास्त तिखट नको असेल तर वरून दही, शेव, टोमॅटो घालू शकता.