ढोकळा

  • १वाटी डाळीचे पीठ,१वाटी ताक(आंबट असल्यास चांगले),तेल,मीठ चवीनुसार
  • साखर १ चहाचा चमचा,आलंमिरची पेस्ट १ चहाचा चमचा,
  • १/२ ते ३/४ चहाचा चमचा इनो किवा फ्रुट्सॉल्ट किवा खायचा सोडा,खोबरे,कोथिंबीर,फोडणीचे साहित्य
४५ मिनिटे
२ जणांना भरपूर

डाळीचे पीठ ताकात भिजवा,त्यात आलंमिरची पेस्ट,मीठ व १.५ चहाचा चमचा तेल घाला व ढवळून एकत्र करा. ५,६ तास  उबेपाशी ठेवा(उदा.ओट्यावर)म्हणजे ते 'फर्मेंट'(मराठी शब्द?)होईल.
कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून घ्या,मिश्रणात साखर घाला, इनो/फ्रुट्सॉल्ट/खायचा सोडा घाला.कुकरची शिटी न लावता साधारण २० मिनिटे उकडा.
तेल गरम करा,त्यात मोहरी,व जरा जास्तच हिंग घाला. हळद घालायची नाही.ही फोडणी ढोकळ्यावर घाला,ओले खोबरे व कोथिंबीर घाला,गार झाल्यावर वड्या पाडा.

२ जणांना भरपूर असे लिहिले आहे खरे,पण..चट्टामट्टा फार पटकन होतो..

माझी आई