ब्रॉवझार

ब्रॉवझार नावाच्या एक वैशिष्ट्यपूर्ण न्याहाळकाबद्दल(browser) नुकतंच वाचलं. फक्त २७३ केबीच्या या न्याहाळकाची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:



हा न्याहाळक संगणकावर स्थापित(install) करावा लागत नाही.
हा न्याहाळक कोणत्याही प्रकारचा इतिहास, कॅशे(cache, मराठी शब्द?)साठवत नाही. किंबहुना यामधे तसा विकल्पच नाही.
हा न्याहाळक कोणत्याही प्रकारची ऑटोकंप्लिट सेवा देत नाही.
या वरील अनावश्यक खिडक्या न चालू देण्याची सुविधा(popup blocker) मात्र आवश्यकते प्रमाणे चालू- बंद करता येते.
हा न्याहाळक आईचेच कवच(IE Shell) वापरतो.
हा न्याहाळक बंद केल्यावर कुकीज्‌(मराठी शब्द?) संगणकावरुन आपोआप पुसल्या जातात.
ह्या न्याहाळकाद्वारे सुरक्षितरित्या व गुप्ततेने महाजालावर(बिनधास्त!) भटकता येते.
हा न्याहाळक लायनक्स व मॅक वर चालत नाही.
हा न्याहाळक वापरता येण्यासाठी संगणकावर विंडोज्‌ ९८ एस्‌. ई आणि ५.५ आया(IE 5.5) स्थापित असाव्या लागतात.


तथापि ही प्रयोगावृत्ती असल्याने किडे(bugs) व इतर समस्या आढळू शकतात. पण माझ्या दॄष्टीने तशी शक्यताही कमीच आहे!

अधिक माहिती इथे मिळेल.

ता.क.: मी स्वतः व माझ्या कुटूंबातील कुणीही "ब्रॉवझार"शी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित नाही. वरील मजकूर फक्त मनोगत व मनोगताच्या सर्व सदस्यांच्या फायद्यासाठीच लिहिला आहे.